Baramati | पंचक्रोशीमध्ये सामाजिक–कृषी नेतृत्वाची नवी उभारी सौ. रेणुका स्वप्निल कारंडे यांच्या उमेदवारीची करंजेपुल कांबळेश्वर पंचायत समिती गनातून राष्ट्रवादीकडे मागणी.

              पुरंदर रिपोर्टर Live 

सोमेश्वरनगर| प्रतिनिधी.  

        कारंजेपूल–होळ, कांबळेश्वर पंचक्रोशी परिसरात सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात प्रभावी कामगिरी करून खास ओळख निर्माण केलेल्या सौ. रेणुका स्वप्निल कारंडे (M.Com) यांच्या उमेदवारीसाठी करंजे फुल कांबळेश्वर पंचायत समिती गण (ओबीसी महिला आरक्षण)राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागणी होत आहे.



पुणे जिल्हा संसाधन व्यक्ती आणि शिवा काका कारंडे फाउंडेशनच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी महिलांचे स्वावलंबन, युवकांना मार्गदर्शन, समाजप्रबोधन आणि कृषी योजनांचे तज्ज्ञ मार्गदर्शन यामधून व्यापक काम केले आहे. कृषी विभाग, पंचायत समिती आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची सखोल जाण असल्याने शेतकरी, युवक–युवतींना ३५% पर्यंत अनुदान मिळवून देण्यात  त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे .



फाउंडेशनमार्फत गेली पाच वर्षे बचत गटांचे सक्षमीकरण, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना प्रसार, किल्ले बनवा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गौरी–गणेश डेकोरेशन स्पर्धा, ह.भ.प. इंदोरीकर महाराजांचे कीर्तन, क्रांती नाना मालेगावकर यांचा “न्यू होम मिनिस्टर” कार्यक्रम, आदर्श सरपंच पेरे पाटील यांचे व्याख्यान, आरोग्य शिबिरे, मोफत चष्मे वाटप आणि पोलीस भरती मार्गदर्शन असे विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत.



कारंडे कुटुंबाचा समाजसेवेचा परंपरागत वारसा देखील ठळक आहे. कै. शिवाजी गणपतराव कारंडे यांनी कारंडेमळा प्राथमिक शाळेसाठी ५ गुंठे जमीन दिली होती; त्याच पावलावर सौ. कारंडे यांनी अंगणवाडीसाठी १ गुंठा तर लक्ष्मी देवी मंदिरासाठी आणखी १ गुंठा देण्याचा मानस व्यक्त केला आहे.

         मा. आमदार रवींद्र धंगेकर यांचे नातेवाईक असल्याने त्यांची राजकीय पार्श्वभूमीही भक्कम आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाबद्दल  विश्वास निर्माण झाला आहे.

          महिला बचत गट, शेतकरी, युवक–युवती आणि विविध सामाजिक घटकांकडून सौ. कारंडे यांच्या उमेदवारीसाठी अनुकूल आहे . पंचक्रोशीमध्ये सामाजिक सेवा, कृषी मार्गदर्शन आणि सांस्कृतिक उभारणीचा संगम असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्या उमेदवारीकडे परिवर्तनाची नवी संधी म्हणून पाहिले जात आहे.

Post a Comment

0 Comments